Small money scheme महिन्याला 5 हजार मिळवा आताच अर्ज करा सरकारची नवीन योजना

Small money scheme आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका सरकारी योजनेबद्दल, जिच्यामध्ये दरमहा 5000 रुपये मिळवण्याची संधी उपलब्ध आहे. या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, अर्ज प्रक्रिया कशी आहे.

अर्ज ऑनलाइन करायचा की ऑफलाइन – या सर्व गोष्टींचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. ही कोणती सरकारी योजना आहे, त्याचा लाभ आपल्याला कसा घेता येईल, हेही आपण बघूया.

Small Money Scheme – दररोज फक्त ₹7 गुंतवा आणि पेन्शनची हमी मिळवा!

राज्य सरकारकडून नागरिकांसाठी एक महत्वाची योजना समोर आली आहे. या योजनेत सहभागी झाल्यास दरमहा 5000 रुपये मिळवण्याची संधी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, या योजनेत दररोज फक्त 7 रुपये गुंतवून तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतर नियमित पेन्शन मिळवू शकता. ही योजना म्हणजे अटल पेन्शन योजना.

या योजनेच्या फायद्यांमुळे नागरिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 1.17 कोटी लोकांनी यात सहभाग नोंदवला आहे.

योजनेत सध्या 7.60 कोटीहून अधिक भागधारक आहेत. व्यवस्थापनाखालील मालमत्तेचा आकडा 44,780 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. पीएफआरडीएच्या माहितीनुसार, नव्याने सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये 55 टक्के महिला आहेत, हे विशेष!

अटल पेन्शन योजना म्हणजे काय?

अटल पेन्शन योजना ही मुख्यतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राबवण्यात येते. या योजनेंतर्गत, 60 वर्षांनंतर निवृत्त झाल्यानंतर नागरिकांना दरमहा 1000 ते 5000 रुपये पर्यंत पेन्शन मिळते. संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर ही पेन्शन त्याच्या/तिच्या जोडीदाराला दिली जाते. त्यानंतर ती रक्कम नामनिर्देशित व्यक्तीस दिली जाते.

कोण अर्ज करू शकतो?

भारतामधील कोणताही 18 ते 40 वयोगटातील नागरिक अटल पेन्शन योजनेसाठी पात्र आहे. ही योजना भविष्यातील सुरक्षित निवृत्तीचे आश्वासन देते. अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बँक खाते, आणि ओळखपत्र आवश्यक असते.

गुंतवणूक कशी करावी?

योजनेत किती पेन्शन मिळेल हे तुमच्या वयावर आणि मासिक योगदानावर ठरते. उदाहरणार्थ, जर तुम्ही 18 वर्षांचे असाल आणि दरमहा फक्त ₹210 गुंतवले, तर 60 वर्षांनंतर तुम्हाला ₹5000 पेन्शन मिळेल. याशिवाय, या योजनेतील गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करसवलत मिळू शकते.

Leave a Comment